SR 24 NEWS

राजकीय

नांदेड आणि बिलोली येथे डाक विभागासाठी अद्ययावत इमारत मंजूर : खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : नांदेड येथील डाक विभागाचे मुख्य कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आले असल्याने येथे अद्यावत अशी इमारत उभारण्यात यावी याशिवाय बिलोली येथे डाक भवन ची नुतन इमारत उभारावी अशी मागणी खा. डॉ.अजित गोपछडे यांनी लावून धरली होती. अखेर या दोन्हीही डाक कार्यालयाच्या नूतन आणि अत्याधुनिक इमारतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. 

नांदेड डाक विभागाचे मुख्य कार्यालय हे बरेच वर्षापासून मोडकळीस आलेल्या इमारतीत असून त्या ठिकाणी कर्मचारी तसेच नागरिकांना डाक विभागाच्या सेवा सुविधा राबविताना बऱ्याच अडचणी येत होत्या, सदर बाब लक्षात येताच खा. डॅा. गोपछडे यांनी मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांचेकडे अद्ययावत सुविधा उपलब्ध होतील अशा सुसज्ज इमारतींची मागणी केली होती. नांदेड डाक मु्ख्य कार्यालयास दिनांक ७ मार्च २०२५ तसेच बिलोली येथील डाक कार्यालयास २३ डिसेंबर २०२४ च्या पत्राद्वारे मंत्री महोदयांनी मान्यता दिली होती. सदर दोन्ही ठिकाणी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून त्याला गती देण्याची मागणी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. तसेच नांदेड डाक विभागाकडे अपुरी जागा असून त्या जागेच्या मागे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची २० गुंठे जागा असून ती जागा डाक विभागास हंस्तांतरित केल्यास पुढील ३० वर्षांचे नियोजन करुन डाक सेवा अद्ययावत स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होतील असे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे. सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागा हंस्तातरित करणेची मागणी केली असून ती मान्य करण्यासाठी मंत्री सकारात्मक आहेत. असेही यावेळी सांगण्यात आले.

मंजूर करण्यात आलेल्या अद्ययावत इमारतीत नांदेड डाक विभागाचे मुख्य कार्यालय , कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र ,केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त गेस्ट हाऊस ( गुरुद्वारा दर्शन साठी देशभरातून अधिकारी येत असतात) , अद्ययावत पासपोर्ट सेवा केंद्र , प्रशस्त डाक वितरण केंद्र , सुसज्ज टपाल तिकीट संग्रह केंद्र (फिलोटेलिक) ,नविन डाक निर्यात केंद्र आदींचा समावेश असणार आहे.

खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खा. डॉ. गोपछडे यांच्या प्रश्न विचारण्याच्या शैलीचे कौतुक केले. मंत्री महोदय म्हणाले की एकाच प्रश्नात बारा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करतो. ही सगळी प्रश्न जनतेच्या हिताची असल्याने प्राधान्य क्रमाने ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या विकसित भारतामध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहे. विविध कामे आगामी काळात योजनांमध्ये समाविष्ट केले जातील अशी माहितीही यावेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सभागृहात दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!