राहुरी ग्रामीण प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे हुंड्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधुरी प्रीतम हारदे यांना सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. ‘तू आजारी आहेस, तुझ्यामुळे मुलेही आजारी पडतील’ असे म्हणत त्यांना वारंवार अपमानित करण्यात येत होते. तसेच फ्लॅट खरेदीसाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले असून, अनेकदा तिला उपाशीपोटी झोपवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पती प्रीतम सुरेश हारदे, सासरे सुरेश हारदे आणि सासू जयश्री हारदे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास संजय ठेंगे पोलीस हवालदार रामनाथ सानप हे करत आहेत.
तुळापूर येथे हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; पतीसह सासरच्या तीन जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












