SR 24 NEWS

राजकीय

अणदूर जि. प. व पं. स. निवडणुकीत कमळ फुलणार – रणवीर चव्हाण

Spread the love

तुळजापूर  प्रतिनिधी /’चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले असून या निवडणुकीत महायुतीचा गड अभेद्य राहील, असा ठाम विश्वास अणदूर पंचायत समिती महायुतीचे तरुण उमेदवार रणवीर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आ. राणादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही लढत अगदी सहज जिंकली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आलूरे–चव्हाण गट व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र आल्यास काय परिणाम होतो, हे संपूर्ण तालुक्याने यापूर्वी अनुभवले असल्याचे सांगत या मतदारसंघात निश्चितच कमळाचा सुगंध दरवळेल, असा आत्मविश्वास रणवीर चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
अणदूर हा तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठा व प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाने नेहमीच सक्षम नेतृत्व देत विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे यावेळीही सर्वसामान्य मतदार विकासालाच प्राधान्य देत आपले मत विकासाच्या पारड्यात टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अणदूरचा शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा वारसा असून स्वर्गीय आलूरे गुरुजी व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, केवळ राजकारण न करता विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे रणवीर चव्हाण यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार राणादादा पाटील यांनी या मतदारसंघासाठी दिलेल्या भक्कम सहकार्यामुळे अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळातही विविध विकास प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास मतदारांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटत नसून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हा मतदारसंघ सुज्ञ व जागरूक असून कोणत्याही अफवा अथवा अपप्रचारांना बळी न पडता मतदार विकासालाच कौल देतील, असा विश्वासही रणवीर चव्हाण यांनी व्यक्त केला.
हा गड अभेद्य ठेवण्यासाठी साहेबराव घुगे, दीपक दादा घोडके, दयानंद मुडके, धनराज मुळे, संगप्पा हगलगुंडे, अप्पू धमूरे, प्रवीण घोडके, आप्पासाहेब शेटे, अक्षय करपे, सुधीर सिंग ठाकूर, महाडप्पा गळाकाटे, डॉ. विवेक बिराजदार, विशाल घुगे, बाबुराव मुळे, अजित गाढवे, काशिनाथ घुगे, रमाकांत माने, डॉ. हरिदास मुंडे, बालाजी मोकाशे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जीवाचे रान करत असल्याचेही त्यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!