SR 24 NEWS

इतर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुरीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांना राहुरी तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुरी तालुक्यात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्व नागरिक सहभागी होणार आहेत.

ही सर्वपक्षीय शोकसभा सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय, स्टेशन रोड, राहुरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या शोकसभेस सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!