SR 24 NEWS

इतर

राहुरीत मल्हारवाडी रोडवर शेतात आढळला कुजलेल्या अवस्थेत वृद्ध महिलेचा मृतदेह

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी बुद्रुक येथील मल्हारवाडी रोडलगत असलेल्या एका शेतात ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लताबाई भास्कर उंडे असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुनील भास्कर उंडे हे आपल्या शेत गट क्रमांक ४६/१ मध्ये पाहणीसाठी गेले असता, त्यांना त्यांची आई लताबाई उंडे या शेतात मृत अवस्थेत आढळून आल्या. मृतदेह काही दिवसांपासून तिथेच असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता.

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले करीत आहेत. प्राथमिक जबाबात कुटुंबीयांनी कोणाविरुद्धही संशय अथवा तक्रार नसल्याचे सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!