नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला हा अर्थसंकल्प 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संकल्पाची पायाभरणी करणारा आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना खा. डॉ. अजित गोपछडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” आणि “सर्वांचा प्रयत्न” या दृष्टिकोनातून प्रेरित केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 भारताला आत्मनिर्भर, समावेशी आणि जागतिक स्तरावर अग्रगण्य अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने एक सशक्त रोडमॅप सादर करतो.
या अर्थसंकल्पात एकूण खर्च ₹53.47 लाख कोटी आणि भांडवली खर्च ₹12.21 लाख कोटी निश्चित करून देशभरात रस्ते, रेल्वे, डिजिटल पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक विकास यांना नव्या गतीने पुढे नेण्यात येणार आहे, तसेच राजकोषीय तूट 4.3% पर्यंत मर्यादित ठेवून वित्तीय शिस्त आणि आर्थिक स्थिरता मजबूत केली जाईल.हा अर्थसंकल्प कृषकांची उत्पन्नवाढ, युवकांना रोजगार, MSME आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन, महिलांना आत्मनिर्भर बनवणे, मध्यम वर्गाला सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा या बाबींवर विशेष भर देतो, ज्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ पोहोचेल.
सेवा क्षेत्र, उत्पादन, सेमीकंडक्टर, टेक्सटाईल, फार्मा, डिजिटल शासन, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये केलेल्या तरतुदींमुळे भारताची जागतिक स्पर्धात्मक क्षमता मजबूत होईल आणि “विकसित भारत 2047” या उद्दिष्टाला साकार करण्यात मदत होईल.राज्यांना कर वाटप आणि विविध योजनांमार्फत ₹25.43 लाख कोटींचा संसाधन हस्तांतरण करून संघीय रचना मजबूत केली जाईल आणि प्रदेशीय विकासाला नवे वळण मिळेल. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रला कर वाटपात सुमारे ₹98,306 कोटींचे वितरण मिळाले आहे, जे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते, मेट्रो, सिंचन, जलपुरवठा, आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था, कृषी पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर आणि रोजगार निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण ठरेल.
महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल कॉरिडॉर्स जाहीर करण्यात आला आहे. *पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल लाईन नांदेडमार्गे काढण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत,* ज्यामुळे मराठवाडा आणि त्या संलग्न क्षेत्राचा विकास होईल. टियर-२ व टियर-३ शहरांच्या विकासासाठी ₹5,000 करोड प्रति सिटी इकॉनॉमिक रिजन घोषित करण्यात आले आहे तर शेती क्षेत्रासाठी ₹37,668 करोड वाटप करण्यात येणार आहेत. एमएसएमई विकासासाठी ₹10,000 करोड एसएमई ग्रोथ फंड राखीव करण्यात आला आहे.बौद्ध सर्किटच्या विकासासाठी ₹5,000 करोडची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला गती मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
आयुष क्षेत्रासाठी ₹3,647 कोटी, 3 नवीन आयुष एAIIMS (दिल्ली, पुणे, मद्रास), 25 नवीन मेडिकल कॉलेज, 157 नवीन नर्सिंग कॉलेज, 10,000 बेड्सचे हॉस्पिटल, 1.5 लाख हेल्थ वर्कर्सची नियुक्ती, ₹10,000 करोडचे फार्मा पार्क, ₹15,000 करोडचे मेडिकल डिवाइस पार्क, आणि ₹20,000 करोडचे बायो-इंफ्रास्ट्रक्चर फंड या तरतुदींमुळे आरोग्य सेवांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होईल.एकूणच, हा अर्थसंकल्प फक्त आर्थिक दस्तऐवज नाही, तर गरीब, कृषक, युवक, महिला, उद्योजक आणि मध्यम वर्गाच्या स्वप्नांना साकार करण्याचे माध्यम आहे, जे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा ठोस पाया तयार करतो असेही खा. डॉ.अजित गोपछडे यांनी सांगितले.
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प : खा. डॉ. अजित गोपछडे

0Share
Leave a reply












