SR 24 NEWS

क्राईम

रिलस्टार कोमल काळे निघाली बसमधील महिलांचे पर्स चोरी करणारी सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेकडुन बंटी- बबलीची जोडी जेरबंद

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 19/11/2025 रोजी दुपारी 03/30 वा. चे सुमारास फिर्यादी सौ. अलका मुकुंद पालवे, वय – 39 वर्षे, रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे त्यांचे कामनिमित्त पाथर्डी ते कल्याण एस.टी. ने पाथर्डी येथुन प्रवास करीत असतांना, कोणीतरी अनोळखी महिलेने फिर्यादीचे समंतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःचे फायद्याकरीता सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली होती. सदर चोरीच्या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 1275/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

 मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या बसमधील चोरी व बस स्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.  वर नमुद सुचनेनुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालींदर माने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते. 

 पथकाने गुन्ह्यातील आरोपीचे व्यवसायीक कौशल्याचा वापर करुन नमुद गुन्ह्यातील महिला आरोपी हि पाथर्डी शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले. पथकाने तिला शिताफीने ताब्यात घेवुन तिचे नांव गाव विचारले असता तिने तिचे नांव 1) कोमल नागनाथ काळे वय – 19 वर्षे रा. पाथर्डी रोड, भिमसेननगर शेवगांव ता. शेवगांव जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. तिला विश्वासात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता. तिने सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याचेकडे दिला असल्याचे सांगितले आहे.

 त्यानंतर पथकाने आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर याचा शोध घेत असता, तो शेवगाव, शंकरनगर येथील त्याचे घरी आल्याची महिती मिळाल्याने, पथकाने तात्काळ त्याचे घरी जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 2) सुजित राजेंद्र चौधर वय – 25 वर्षे मुळ रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर, हल्ली रा.शंकरनगर शेवगांव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास त्याची प्रियसी कोमल काळे हिने बसमधील महिलांचे पर्समधील चोरी केलेल्या सोन्याचे दागिणे व रोख रक्कम बाबत विचारपुस केली असता त्याने कळविले की, कोमल हिने चोरी केलेल्या रोख रक्कमेतुन आम्ही 1) 1,70,000/-रु कि.चा आय फोन 17 प्रो मॅक्स मोबाईल 2) 15,000/-रु कि.चा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतले होते. तसेच 7,48,000/-रु कि. चे 6.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे माझ्याकडे दिले होते. त्याप्रमाणे आरोपीकडुन वर नमुद मोबाईल, सोन्याचे दागिणे व 2230/-रुपये रोख रक्कम असा एकुण 9,35,230/-रुपये कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 

 तसेच महिला आरोपी कोमल नागनाथ काळे व आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर यांना विश्वासात घेवुन आणखी गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी 1) अमरापुर ते शेवगाव जाणारे बसमध्ये दिनांक 18/10/2025 रोजी पर्समधुन सोन्याचे दागिणे चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच 2) दिनांक 20/11/2025 रोजी पाथर्डी ते भगुर जाणारे बसमधुन एक महिलेचे पर्समधुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली असल्याचे सांगितल्याने सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखाची खात्री केली असता खालील प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे

 

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

 

1 शेवगाव जि. अहिल्यानगर गु.र.नं. 908/2025 बी.एन.एस. क. 303(2)

 

2 शेवगाव जि. अहिल्यानगर गु.र.नं. 959/2025 बी.एन.एस.क. 303(2)

 

 

 

 महिला आरोपी नामे कोमल नागनाथ काळे हिचेविरुध्द यापुर्वी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 शिरुर कासार जि.बीड 178/2022 भा.द.वि. क. 363,324,323,504,506,34

2 गेवराई जि. बीड 529/2022 महाराष्ट्र पोलीस अधि.क.124

3 सुपा जि.अहिल्यानगर 67/2024 भा.द.वि. क. 379

 आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर याचेविरुध्द यापुर्वी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरीचोरी, घरफोडी व इतर 8 गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 सोनई जि. अहिल्यानगर 191/2022 भा.द.वि. क. 395,392,363,341,412

2 सोनई जि. अहिल्यानगर 163/2022 भा.द.वि. क.395,341

3 सोनई जि. अहिल्यानगर 184/2022 भा.द.वि. क. 392,201,34

4 पाथर्डी जि. अहिल्यानगर 90/2022 भा.द.वि. क. 392,201,34

5 पाथर्डी जि. अहिल्यानगर 88/2023 भा.द.वि. क. 454,457,380

6 तोफखाना जि. अहिल्यानगर 393/2024 म.पो.का.क.129,131(क)

7 एम.आय.डी.सी. जि. अहिल्यानगर 321/2025 बी.एन.एस.क.316(2),317(2)

8 चकलंबा जि.बीड 84/2022 भा.द.वि.क.392,34

 ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1275/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.  सदर गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे हि रिलस्टार असुन तिचा इंस्टा आय. डी. komal¬_ kale_1__ असा असुन तिचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच बसमध्ये प्रवास करत असतांना कोणत्याही अनोळखी भोळ्या भाबड्या चेह-याच्या महिला व इसमावर विश्वास ठेवु नका व आपले मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी, असे नागरिकांना अव्हान करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!