पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : देशभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा होत असताना, पारनेर तालुक्यातील तास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही हा दिवस मोठ्या आनंदात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत उपसरपंच संगीता बाजीराव काळनर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सुरात सर्वांनी उभे राहून ध्वजाला वंदन केले आणि भारतमातेच्या वीर पुत्रांना अभिवादन केले.
यावेळी उपसरपंच काळनर यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळींची आठवण करून दिली. इंग्रजांविरुद्ध लढताना कायदेभंग, बहिष्कार, उपोषण, मोर्चे व स्वदेशी आंदोलन या मार्गांचा अवलंब करून असंख्य वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा दिली.
कार्यक्रमास गणपत काळनर, दत्ता दाते, संतोष गागरे, निवृत्ती बागुल, नानासाहेब बाचकर यांसह गावातील मान्यवर, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक झावरे सरांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत शिक्षणासोबतच समाजसेवेतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच संगीता काळनर यांच्या हस्ते शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांचा व कार्यतत्पर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
तास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा उपसरपंच संगीता बाजीराव काळनर यांच्या हस्ते शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान

0Share
Leave a reply












