तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : मोबाईल व डिजिटलचा अतिवापर युवा पिढीला धोक्याची घंटा असून ही घातक प्रवर्ती समाजात मोठ्या प्रमाणात फोपावत असून वेळीच याला पालकांनी पायबंद घालून पाल्यांना वाचन संस्कृतीचा मार्ग दाखवून भारतीय संस्कृती, परंपरा बळकटीची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करून वाचाल तर वाचाल याची जाणीव खऱ्या अर्थाने जोपासण्याची गरज असल्याचे प्रभात मंडळाचे अध्यक्ष महादेव अण्णा मुळे यांनी व्यक्त केले.
येथील समाज चळवळीतील कार्यकर्ता तथा वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त एमजी ग्रुपच्या महादेव वाचनालयास पुस्तके भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे, चंद्रकांत करपे, देवाप्पा गोवे व ज्ञानदेव कांबळे उपस्थित होते. प्रारंभी प्रभात मंडळाचे अध्यक्ष महादेव अण्णा मुळे व गणेश स्वामी यांच्या हस्ते आर .एस .गायकवाड यांचा शाल फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, जन्मदिनामुळे वाचनालयास पुस्तके भेट देण्याची सौभाग्य- प्रेरणा मिळाल्याचे सांगून, प्रगतीच्या नावाने जग कितीही पुढे गेले तरी आई-वडील-पुस्तकच खऱ्या अर्थाने गुरु असून आकाशात झेप घेण्यास तंत्रज्ञानाची गरज नसून पंखात बळ असणे गरजेचे असल्याचे सांगून घराघरात वाचन चळवळ रुजली तरच भावी काळात सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी एमजी ग्रुपचे महेश आलूरे, गणेश स्वामी, अतुल कस्तुरे, रवींद्र व्हड्रे, सुनील कस्तुरे, सुभाष पाटील, पप्पू शेख, अनिल स्वामी, प्रमोद घोडके, प्रशांत लंगडे सह बहुसंख्य युवक उपस्थित होते.
युवा पिढीला मोबाईल अतिवापर धोक्याची घंटा, वाचन संस्कृतीला बळकटीची आवश्यकता : महादेव अण्णा मुळे

0Share
Leave a reply












