राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत विना नंबर प्लेट दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याची माहिती मिळाल्याने आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी राहुरी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली.या मोहिमेदरम्यान एकूण 55 विना नंबर प्लेट दुचाकी आढळून आल्या. त्यापैकी 46 वाहनांवर 25,700 रुपयांचा दंड आकारून, तात्काळ नंबर प्लेट बसविण्यात आल्या. मात्र 9 वाहन चालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने ती वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून त्यांच्या मालकीबाबत खात्री करून पुढील कारवाई सुरू आहे.
राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट अनिवार्यपणे बसवाव्यात. यामुळे विनाकारण दंड आकारला जाणार नाही तसेच चोरीची वाहने शोधण्यास सोय होईल.
ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.यामध्ये पोउपनि. गणेश वाघमारे, पोउपनि. राजू जाधव, पोउपनि. विष्णू आहेर, सफौ. आव्हाड, पोहेकॉ. संतोष ठोंबरे, बापू फुलमाळी, पोना. जालिंदर साखरे, पो.कॉ. सतीश कुऱ्हाडे, गणेश लिपने, शेषराव कुटे, इफ्तेखार सय्यद, अमोल भांड, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, कोळी तसेच होमगार्ड कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.
राहुरी पोलिसांचा शोरूम व पालकांना इशारा
नवीन वाहनांना नंबर प्लेट नसताना रस्त्यावर आणल्यास संबंधित शोरूमवर आरटी ओमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.
राहुरी पोलिसांची विशेष मोहीम : 55 विना नंबर प्लेट दुचाकींवर कारवाई, 09 वाहनांची कागदपत्रे न सादर केल्याने पोलीस स्टेशनमध्ये जमा

0Share
Leave a reply












