मानोरी (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी प्रवास सुरू असताना, देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्याचाच भाग म्हणून मानोरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. मानोरी येथे १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी सलग तीन दिवस ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत भव्य आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळच्या प्रसन्न वाऱ्यात तिरंगा झेंड्याचे अभिमानाने फडकणे पाहून गावकऱ्यांच्या हृदयात देशभक्तीची नवी उमेद चेतवली.
संस्थेचे चेअरमन शरदराव पोटे यांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा आकाशात लहरताच राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या मनात एकात्मतेची आणि देशसेवेची नवी ऊर्जा निर्माण झाली.
या सोहळ्यास संस्थेचे व्हा. चेअरमन प्रतिनिधी साहेबराव आढाव, संचालक भास्कर भिंगारे, डॉ. राजेंद्र पोटे, नवनाथ थोरात, रायभान आढाव, देविदास वाघ, सोहबराव बाचकर, गोरक्षनाथ खुळे, रामदास सोडनार, दत्तात्रय आढाव, रावसाहेब चुळभारे, बाबादेव काळे, भीष्मराज गरुड, काशिनाथ काळे, ज्ञानदेव शेळके, चंद्रकांत पोटे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
मान्यवरांनी देशभक्तीपर कविता आणि विचार मांडून तरुणांना प्रेरणा दिली. राष्ट्रभक्तीच्या गीतांच्या गजराने वातावरण भारावून गेले. संस्थेकडून ८वी, ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.एकोपा, सहकार्य आणि देशभक्ती या मूल्यांचा सन्मान राखत साजरा झालेला मानोरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. मानोरी यांचा स्वातंत्र्यदिन सोहळा गावाच्या इतिहासात संस्मरणीय ठरला.
मानोरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेत स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा, देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

0Share
Leave a reply












