SR 24 NEWS

सामाजिक

अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पालक मातांसाठी हळदी-कुंकू व स्पर्धांचे आयोजन

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) : मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मांजरी येथे रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सर्व पालक मातांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच विविध मनोरंजक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मातृत्वाचा सन्मान करणे, भारतीय संस्कृतीचे जतन करणे तसेच पालक व शाळा यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणे हा मुख्य उद्देश असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ. भावना शिंदे यांनी दिली. मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप, हळदी-कुंकू समारंभ, पारंपरिक वातावरण आणि विविध आनंददायी उपक्रमांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरणार आहे.

हा उपक्रम इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मोहिनीराज होन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, डॉक्टर सोनाली चव्हाण मॅडम या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालक मातांसाठी विविध सहभागात्मक व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

परंपरा, आनंद आणि स्नेह यांचे सुंदर संमेलन असलेल्या या कार्यक्रमास सर्व पालक मातांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!