तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठान संबोधली जाणारी अणदूर जिल्हा परिषद ,पंचायत समिती व चिवरी गणात सरळ लढत होण्याचे चित्र असून तिन्ही मतदार संघ सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षित असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले असून चव्हानांच्या अस्तित्वाची तर आ लूरे यांचे प्रतिष्ठाची म्हणून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
वास्तविक पाहता महायुतेचे उमेदवार अड. दीपक आलूरे यांची कार्यकिर्द सर्व समावेशक असून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन, माजी पशुसंवर्धन सभापती, सध्या भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशी त्यांची जमिनीची बाजू आहे. तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा दादा पाटील यांचे गेले दहा वर्षे विश्वासू समर्थक म्हणून गेल्या पाच वर्षात मतदार संघात कोट्यावधीचा निधी आणल्याने विकासाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे हे गेली वीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य, श्री संकुलन श्री श्री रविशंकर विद्यामंदिराच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक ,. जनमानसात त्यांची प्रतिमा जमिनीची बाजू असली तरी ते दोघे सख्खे मावश भाऊ आहेत हे विशेष.
तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण हे प्रथमच निवडणुकीत प्रवेश केल्याने चव्हानांच्या अस्तित्वाची म्हणून ओळखले जाते. तर महाआघाडीचे विशाल शेटे यांनी प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत.एकंदरीत नात्यागोत्याचे व जातीपातीचे पलीकडे बहुजन समाज कोणाच्या पारड्यात दान टाकणार यावरच उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
जिल्हा परिषदेच्या तुल्यबळ उमेदवारावरच पंचायत समितीच्या गणाचे उमेदवाराचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्या तरी सरळ वाटत असले तरी येणाऱ्या काळात काट- शह, वजाबाकीचे राजकारण मात्र तापण्याचा अंदाज जाणकारातून व्यक्त केला जात आहे.
अणदूर जि. प.व पंचायत समिती गणात सरळ लढत.., चव्हाण यांच्या अस्तित्वाची तर आलूरे यांचे प्रतिष्ठित निवडणूक..!

0Share
Leave a reply













