SR 24 NEWS

इतर

बारागाव नांदूर येथे ‘साई आदर्श’ को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नव्या शाखेचा शनिवारी उद्घाटन सोहळा

Spread the love

राहुरी वेब प्रतिनिधी : साई आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, राहुरी यांची बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथे नवीन शाखा सुरू होत असून, या शाखेचा भव्य शुभारंभ शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन वरद विनायक धाम, लोणीचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून संजय ठेंगे (पोलीस निरीक्षक, राहुरी), प्रभाकर गाडे (सरपंच), सुरेखाताई धनवडे (उपसरपंच), शिवाजीराजे पवार (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती), मच्छिंद्र कोहकडे सर, श्रीराम गाडे, विश्वास तात्या पवार, सत्यवान पवार, भाऊसाहेब गाडे, जालिंदर गाडे, धनराज गाडे, शकुंतला गाडे, वसंतराव गाडे, बाळासाहेब गाडे, पंढरीनाथ पवार, युवराज गाडे, गोरख गाडे, अर्जुन गाडे सर, डॉ. तनवीर देशमुख, चांगदेव गाडे, लखु नाना गाडे यांच्यासह बारागाव नांदूर ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व संचालक मंडळ यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!