SR 24 NEWS

राजकीय

तुळजापूर पंचायत समितीत भाजपाचे प्राबल्य, सभापतीपदी रणवीर चव्हाण यांची वर्णी शक्य !

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : संपूर्ण  धाराशिव जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या व प्रतिष्ठेची समजले जाणाऱ्या अणदूर पंचायत समिती गणातून भाजपाचे नेते सुनील मालक चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण यांची प्रथमच निवडणुकीतील एन्ट्री ते ही सभापती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली होती. सर्वप्रथम दिशा शक्ती न्यूज ने रणवीर चव्हाण यांचा विजयाचा मार्ग मोकळा या मथुराखाली बातमी प्रसिद्ध केली होती, त्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील मालक चव्हाण यांचा करिष्मा येथे पहावयास मिळाला हे नाकारता येणार नाही.

आज सभापती पदासाठी विक्रम सिंह देशमुख व संतोष दादा बोबडे यांच्या नावाची चर्चा चालू असले तरी सुनील मालक चव्हाण यांच्यामुळे तुळजापूर तालुक्यात भाजपाला मिळालेले यश व बळ आगामी काळात भाजपाला सार्थक ठरणार आहे.प्रारंभीच सभापती पदाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले व सुनील मालक चव्हाण यांचा करिष्मा असलेले रणवीर चव्हाण यांचा सभापतीचा मार्ग निश्चितच सुकर होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

तुळजापूर तालुक्यात आ.रांना दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून विविध विजय खेचून आणले. एवढेच नव्हे तर नळदुर्ग नगर परिषदेवर एक हाती सत्ता संपादन करून आपली पकड मजबूत केले हे मात्र नाकारता येत नाही. युवा नेतृत्व रणवीर चव्हाण यांना संधी मिळाल्यास भाजपाला बळ आगामी काळात बळ मिळेल यासाठी हालचाली चालू असल्याचा बोलबाला आहे.अणदूर जिल्हा परिषद गटात दीपक दादा आलूरे यांनाअल्पमतांनी पराभवाचा फटका सहन करावा लागला असला तरी अणदूर व चिवरी गणात भाजपाला मोठा विजय खेचून आणला आला हे विशेष.

एकंदरीत पाहता तुळजापूर तालुक्यात भाजपाला चांगले दिवस आले असून आगामी काळात अशीच भरभराटीसाठी युवा नेतृत्व रणवीर यांना सभापतीपदाची माळ घालावी अशी भावना युवकातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राणा दादा पाटील याचा निश्चितच विचार करतील अशी आशा युवकातून ऐकावयास मिळत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!