विशेष प्रतिनिधी (वसंत रांधवण, पारनेर) : वडगाव सावताळ येथिल सामाजिक कार्यकर्त्या जयश्री प्रदिप रोकडे यांची पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या) तालुका युवती प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल वडगाव सावताळ व खामकर झाप ग्रामस्थांच्या वतीने रोकडे यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
जयश्री रोकडे ह्या आमदार काशिनाथ दाते यांच्या कुटुंबातील अतिशय जवळचे विश्वास म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न मांडणारे जयश्री रोकडे यांनी तालुक्यात महिलंचे संघटन अधिक भक्कम उभे केले आहे. युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे यांनी व आमदार काशिनाथ दाते यांच्या मान्यतेने रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोकडे यांच्या नेतृत्वाखाली युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला बळकटी येण्याची अपेक्षा असल्याचे पारनेर तालुका युवती अध्यक्षा अपर्णा खामकर यानी सांगितले.
यावेळी रोकडे म्हणाल्या की, पक्षाने व वरिष्ठांनी जो विश्वास टाकला आहे त्याला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. पक्षाची भूमिका,तत्व आणि विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक बी. टी. खामकर, भाऊसाहेब दाते, बाबासाहेब दाते, हनुमंत ठाणगे, दादाभाऊ रोकडे, प्रेमानंद महाराज आंबेकर,संदिप व्यवहारे, सुनील खामकर, राजेंद्र रोकडे,गुलाब रोकडे, राजेंद्र भोसले, सुनील रोकडे, अर्जुन रोकडे, अर्जुन साळुंके, भाऊसाहेब जांभळकर, सुर्याभान जाधव,बाळू रोकडे, बाबाजी खामकर, तुकाराम रोकडे, ज्ञानदेव रोकडे, नामदेव रोकडे, अशोक रोकडे, दत्ता शिंदे,शिवा भनगडे, प्रदिप रोकडे, पांडुरंग निवडुंगे,महादू रोकडे,दामू पवार, बाळासाहेब रोकडे, देवराम जांभळकर, आप्पा रोकडे, सुभाष खंडागळे, दादा आंबेकर, बाळासाहेब सांबारे, माणिक कांडेकर, नामदेव खामकर,भाऊ शिंदे,गो. या. रोकडे, रंगनाथ शिंदे,मंजाबापू रोकडे, गिताराम शिंदे, बाळासाहेब झावरे, संदिप झावरे, बाबासाहेब रोकडे, राघु साळवे, सतिश तिखोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती प्रवक्तापदी जयश्री रोकडे, आमदार काशिनाथ दाते यांच्या मान्यतेने निवड

0Share
Leave a reply












