राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : राहुरी येथे तिरुपती महिला ग्रुप असून या महिलांनी जागतिक तीर्थक्षेत्र असलेले श्री तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थानाची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला होता. परंतु तिरुपती बालाजी येथे वर्षानुवर्षे सेवेसाठी नंबर लागत नाही. मात्र या महिलांच्या बालाजी ग्रुपने अथक प्रयत्न करून तिरुपती बालाजी यांच्या सेवेसाठी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर त्यांना तिरुपती बालाजी देवस्थान मंदिरात एक आठवडा सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.
ही सेवा उपलब्ध होण्यासाठी अनेक अडथळे येतात परंतु त्या अडथळ्यावर मात करीत या तिरुपती महिला ग्रुपने या सेवेचा आनंद घेतला आहे. विशेष म्हणजे ही सेवा मंदिरात एकदाच मिळते परंतु या ग्रुपला मंदिराच्या गाभाऱ्यात सतत दोन दिवस सहा तास तिरुपती बालाजी ची सेवा करण्याची संधी मिळाल्याने या तिरुपती महिला ग्रुपचा आनंद द्विगुणीत झाला आहे. देशभरातून महिला व पुरुष तिरुपती बालाजीच्या सेवेसाठी आटोकाट प्रयत्न करत असतात परंतु ही सेवा मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. परंतु राहुरीतून तिरुपती महिला ग्रुप हा पहिलाच असल्याने या ग्रुपचे मोठे कौतुक होत आहे.
जागतिक तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थान हे जगप्रसिद्ध असून जगातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या देवस्थानचे अनन्य महत्त्व आहे व याच ठिकाणी राहुरीतील या महिला ग्रुपचा सेवेसाठी नंबर लागल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. राहुरीतील या तिरुपती महिला ग्रुप साठी मनीषा भुजबळ यांनी मोठे प्रयत्न करून तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थानची सेवा या महिलांना उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे. या महिलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था देवस्थान तर्फे झालेली आहे.
राहुरीतील तिरुपती महिला ग्रुप मध्ये सुनंदा परदेशी,हेमलता तनपुरे, नलिनी तनपुरे, जयश्री तनपुरे ,संगीता पाटील, देवयानी तनपुरे, शीतल कासार, मंदा औटी, सुरेखा माकोने, इंदुबाई जाधव आदींचा समावेश असून या सर्वांची व्यवस्था व देवस्थानाशी संपर्क करून मनीषा भुजबळ यांनी हा ग्रुप तयार करून थेट जागतिक दर्जाचे तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थान येथे सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिल्याने त्यांचेही सर्वांनी विशेष कौतुक केले आहे.
जागतिक दर्जाचे तिरुपती बालाजी वेंकटेश देवस्थान येथे जाऊन राहुरीतील महिलांच्या ग्रुपने आठ दिवस सेवा करण्याची संधी प्राप्त केली.
राहुरीतील महिलांचा तिरुपती ग्रुप थेट तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थानच्या सेवेला !, जागतिक दर्जाच्या तिरुपती बालाजी व्यंकटेश देवस्थानची आठ दिवस सेवा करण्याची संधी प्राप्त!!

0Share
Leave a reply












