SR 24 NEWS

सामाजिक

“जवाहर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर”

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत धालगुंडे : तुळजापूर येथील जवाहर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यांचे राष्ट्रीय सेवा विशेष समसंस्कार शिबिर मौजे रामतीर्थ जळकोट येथे सुरू झाले असून, शिबिराच्या अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक जाणीव जागृती या विषयावर विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. वैज्ञानिक दृष्टिकोन जोडावा तरुणांनी विवेकनिष्ठ विचार स्वीकारावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच क्ष्‍मण राठोड, शिवाजी राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सूर्यकांत आगलावे, महाराष्ट्र आणि राज्य कार्यकारणी सदस्य निशा भोसले, सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उषा शहा, आर डी गायकवाड, अण्णा दीक्षित, लता ढेरे सह अतिथी उपस्थित होते.

यावेळी अण्णा दीक्षित यांनी संत सेवालाल महाराज व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा आढावा घेत समाजाचे अंधश्रद्धा विरुद्ध त्यांनी केलेल्या प्रबोधन कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून समाज हितासाठी समर्पित वृत्तीने कार्य करावे असे आव्हान केले.

प्राचार्य डॉक्टर उमाकांत सुनील शेट्टी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणीचे जाणीव अधिक होत असून समज प्रबोधनाच्या कार्यात सक्रिय सहभाची निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजप्रबोधनाच्या कार्यात शिवाजीने भाग घेण्याचे आवाहन केले. 

यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सूर्यकांत आगलावे, मअंनिस राज्य प्रा. डॉ. दयानंद कांबळे, प्रा. डॉ. सुधाकर सांगळे, प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार, प्रा. डॉ. गुंडू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!