SR 24 NEWS

सामाजिक

श्रीमती अंजना पापडे यांना ‘दिव्यांग प्रेरणा व आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मान

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती अंजना पापडे यांना शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १८ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे ‘दिव्यांग प्रेरणा व आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षकवर्ग व ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासन यांच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने जागतिक दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मौनिक घोष यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्रीमती पापडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या यशाबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता देशमुख, पृथ्वी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, सुरेखा शिरसागर, मंजिरी जेटी थोर, सुमन घोडके, अमोल कांबळे व राहुल घोडके यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच जय मल्हार पत्रकार संघ यांच्या वतीनेही श्रीमती पापडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजू आलुरे, शिवशंकर तिरगुळे, दयानंद काळुंके व सचिन तोग्गी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!