SR 24 NEWS

राजकीय

नळदुर्ग नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी खुलं ; इच्छुकांची सोशल मीडियावर धावपळ – बसवराज धरणे यांच्या पोस्टची ‘त्सुनामी’!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : गेल्या चार वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी खुलं झाल्याने सर्वच पक्ष आणि आघाड्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पदासाठी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावर उमेदवारांच्या पोस्ट्सचा पाऊस पडत असून बसवराज धरणे, संजय बताले, अशोक जगदाळे, सरदारसिंग ठाकूर, नय्यर जागीरदार, निखिल घोडके, पिंटू पुदाले आणि शहबाज काझी यांच्या प्रचारात्मक पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, बसवराज धरणे यांच्या समर्थनाची ‘त्सुनामी’ सोशल मीडियावर स्पष्टपणे जाणवते आहे.

नळदुर्ग नगरपालिकेतील दहा प्रभागांतून वीस नगरसेवक निवडले जाणार असून जवळपास १८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडणूक रंगतदार आणि बहुरंगी होणार हे निश्चित. उमेदवारांचे वैयक्तिक प्रतिष्ठान, कार्यकर्ता वर्गातील पकड आणि पक्षाची भूमिका — या तिन्ही गोष्टींवर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

इतिहास पाहता, नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रभाव राहिला आहे. मात्र, विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची या मतदारसंघावर मजबूत पकड लक्षात घेता, आघाडी त्यांना कशी टक्कर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकीय पातळीवर आता महायुती, महाआघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, नळदुर्गमधील निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!