तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : “पाणी जीवन असले तरी प्राणवायू हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून त्याची जोपासना करण्याची ही काळाची गरज आहे. भौतिक सुखाबरोबरच भावी पिढ्यांना निरोगी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर वृक्षतोड थांबवून अधिकाधिक वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट मत तुळजापूर तालुक्यातील सरपंच रामचंद्र आलुरे यांनी व्यक्त केले.
ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या स्वागत व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या दिंडीत तेलंगणा ते श्री क्षेत्र नाणीजधाम असा सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास होत असून हजारो भाविक भक्तगण उपस्थित होते.आलुरे म्हणाले की, “वसुंधरा पायी दिंडी हा केवळ धार्मिक प्रवास नसून जगाला प्रेरणा देणारा आणि नैसर्गिक असमतोल दूर करण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे. अतिवृष्टी, भूकंप, दुष्काळ या सारख्या आपत्ती मानवनिर्मित आहेत. आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावल्यास ही संकटे टळतील.
यावेळी धाराशिव जिल्हा निरीक्षक संतोष केसकर म्हणाले, “कोरोना सारख्या जागतिक संकटाने मानवाला नैसर्गिक असंतोलाची जाणीव करून दिली आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून ती प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचा भाग म्हणून स्वीकारली पाहिजे. वसुंधरा दिंडी हा त्याग, पर्यावरण संरक्षण आणि जागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे.
या ”कार्यक्रमाला दीपक मुळे, अण्णा महाराज, राजू गोवे, मधुकरअण्णा बंदपट्टे, संतोष मडूळे, राधा गिरी, दत्तात्रय खरात, काशिनाथ माने, विठ्ठल होगाडे, संध्या अंधारे, मारुती मोरे यांसह असंख्य भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “वृक्ष हेच जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांची लागवड हीच भविष्यातील सुरक्षिततेची हमी आहे,” असा संदेश या दिंडीतून देण्यात आला.
भौतिक सुखाबरोबरच प्राणवायू हा जीवनाचा अविभाज्य घटक – वसुंधरा पायी दिंडीत सरपंच रामचंद्र आलुरे यांचे स्पष्ट मत

0Share
Leave a reply












