तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील तरुण शेतकरी उमेश सूर्यकांत ढेपे यांनी दिनांक ३० सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान व वाढलेले आर्थिक संकट या कारणामुळे नैराश्यातून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता, धाराशिवचे खासदार खा. ओमराजे निंबाळकर यांनी अणदूर येथे भेट देत ढेपे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी ढेपे यांच्या पत्नी व मुलांना धीर देत, “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उभारीसाठी सर्वतोपरी मदत करू, धीर सोडू नका,” असे आश्वासन दिले.
तुळजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. शासनाकडून पंचनाम्याचे काम अद्याप सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व असंतोष पसरला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
या प्रसंगी ऋषी मगर, डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण पाटील, गौरीशंकर कोडगीर, श्याम पवार, अविनाश मोकाशे, बालाजी मोकाशे, सुदर्शन मोकाशे, सचिन ढेपे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे, खा.ओमराजे निंबाळकर यांच्याकडून सांत्वन — मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

0Share
Leave a reply












