SR 24 NEWS

इतर

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमात नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : खा. डॉ.अजित गोपछडे यांचे आवाहन

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे :  नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील या कार्यक्रमात नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. देशासह परदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी ही नांदेडकरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) नुकताचंसविस्तर आढावा घेतला आहे. मोदी मैदानावरील कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात ५२ एकर मैदानावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मैदानालगत दोन टेन्ट सिटी, त्यामध्ये सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता, हॉटेल्स, शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरणार आहे.

गुरुगोविंद सिंघ जी यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नांदेड येथे पार पडणारा हिंद दी चादर कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी नांदेडकरांनी स्वतः पुढाकार घ्यावा. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे. भारतीय जनता पार्टी सह सर्व पक्षीय सर्व लोकप्रतिनिधींनी , आजी माजी पदाधिकाऱ्यांनी , सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने या सोहळ्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही खा. डॉ . अजित गोपछडे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!