SR 24 NEWS

राजकीय

अणदूर पंचायत समिती गणात रणवीर चव्हाण यांचा विजयाचा मार्ग सुकर ; किंगमेकरच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी अणदूर पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक लढत आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणवीर चव्हाण यांचा विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

अणदूर पंचायत समिती गणात चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मालक चव्हाण यांचे सुपुत्र रणवीर चव्हाण यांच्यासह एकूण सहा उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र २७ जानेवारीपूर्वीच अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रथमच राजकारणात प्रवेश करणाऱ्या रणवीर चव्हाण यांची बाजू भक्कम झाल्याचे चित्र आहे.

तुळजापूर तालुक्यातील राजकारणात ‘हुकमी एक्का’ आणि ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेल्या मालक चव्हाण यांच्या राजकीय गणिताला यश येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

एकूणच अणदूर पंचायत समिती गणातून तालुक्याच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, या बदलाच्या वाऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २७ जानेवारी रोजी अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी, त्याआधीच राजकीय गणिते रंगू लागल्याने मतदारांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!