SR 24 NEWS

राजकीय

राहुरीतील भाजपचा निर्धार मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार संग्राम जगताप राहणार उपस्थित 

Spread the love

राहुरी वेब प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयात दि. ५ नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर भाजप कार्यकर्ते व कर्डिले कुटुंबियांसाठी हा मेळावा भावनिक तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.या मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आगामी सर्व निवडणुकांमध्ये त्यांना पाठबळ देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त करणे हे आहे.

या मेळाव्याला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार सुजय विखे-पाटील, तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या मेळाव्याचे राजकीय वजन अधिक वाढले असून, येणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहुरीकडे लागले आहे.

या मेळाव्याच्या तयारीसाठी राहुरी येथे अलीकडेच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला तालुका भाजप अध्यक्ष सुरेशराव बानकर, अमोल भनगडे, विक्रम भुजाडी, रवींद्र म्हसे, सचिन मेहेत्रे, सतीश फुलसौदर, शामराव निमसे, आबासाहेब येवले, अनिल आढाव, सुजय काळे, उमेश शेळके, अनिल पवार, मनोज गव्हाणे, सुनील देशमुख यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यामुळे राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांच्या नजरा आता या निर्धार मेळाव्यावर खिळल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!