मानोरी (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ : राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. ठरलेल्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा साधेपणाने पण आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यात लोकनियुक्त सरपंच सौ. ताराबाई भिमराज वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. “नवीन कार्यालयामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या प्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती नाना आढाव, कचरूनाना आढाव, उपसरपंच प्रतिनिधी अमोल भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, एकनाथ आढाव, अलका भिंगारे, ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड, क्लार्क सागर भिंगारे, योगेश आढाव, अशोक कोहकडे, सुखदेव जाधव, बाळासाहेब कोहकडे, पोपटराव आढाव सर, डॉ. अजिंक्य आढाव, दत्तू कोळसे, उत्तम तनपुरे, चांगदेव आढाव, सोमनाथ थोरात, राहुल वाघचौरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.समाधान व उत्साहाचे वातावरण
कार्यक्रमात आलेल्या मान्यवर व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग देत आपला आनंद व्यक्त केला. भूमिपूजनानंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. “ग्रामपंचायतीच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. राहुरी तालुका भाजप कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब वाघ यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले –
“नवीन ग्रामपंचायत कार्यालय ही केवळ इमारत नसून, गावाच्या प्रगतीचे केंद्रस्थान ठरणार आहे. प्रत्येक ग्रामस्थासाठी हे कार्यालय खुले असेल आणि विकासाच्या योजनांचा पाया इथूनच रचला जाईल. गावातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने सेवा मिळावी, हेच आमचे ध्येय आहे.”
ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड म्हणाले –
“ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी स्वतंत्र व सुबक इमारत उभी राहत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. नवीन कार्यालयामुळे नागरिकांना सेवा देणे अधिक सुलभ होईल.
तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पारदर्शक कारभार राबवून प्रत्येक नागरिकाचा विश्वास संपादन करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
गावाचा विकास हाच संकल्प” मानोरीत ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन,अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला शुभमुहूर्त अखेर ठरला

0Share
Leave a reply












