श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे येथील आनंद निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ध्वजारोहणाचा मान देशाच्या सीमेवर शौर्याने कर्तव्य बजावणारे गंगापूर येथील जवान श्री. विजयराव नान्नोर यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख अहिल्यानगर रंगनाथ तमनर, वसंतराव कोळेकर सर, संदीप खेमनर (एस.आर.पी. पुणे), प्राचार्य सौ. संगीता वसंतराव कोळेकर मॅडम, गणेश वरखड, कादिर पटेल, प्रमोद चोपडे, सुनील शिंदे, राजेंद्र जगताप, लक्ष्मण चिंधे, मोसिम शेख, विनोद कुदनर, पोलीस कॉन्स्टेबल लोणी पोलीस स्टेशन गणेश अडांगळे, पोलीस कॉन्स्टेबल सौ. बाचकर मॅडम, तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर भाषणांनी झाली. यानंतर सौ. पूजा खेमनर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.प्रास्ताविकामध्ये प्राचार्य सौ. संगीता कोळेकर मॅडम यांनी शाळेच्या विविध गुणवत्तांविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशातील जवानांच्या त्यागामुळे आपला देश सुरक्षित आहे व आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशानेच ध्वजारोहणासाठी जवानास आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यशवंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख रंगनाथ तमनर यांनी स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा वेध घेतला. तर मेजर विजय नान्नोर यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम जागृत ठेवण्याचे प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षकवृंदामधील कविता दरंदले मॅडम, स्वाती पारखे मॅडम, सारिका काळे मॅडम, शितल सातपुते मॅडम, सारिका खर्डे मॅडम, पौर्णिमा कानडे मॅडम, सुवर्णा थोरात मॅडम यांनीही हजेरी लावली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूजा खेमनर मॅडम व रंगनाथ तमनर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कविता दरंदले मॅडम यांनी केले.
Leave a reply

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :











