राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अहिल्यानगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वर्षातून एकदा मिळणारा दिव्यांगाचा निधी 3000₹मिळतो त्यामध्ये वाढ दहा हजार रुपये मिळावा. यासाठी प्रहारच्यावतीने निवेदन देण्यात आले. राहुरी शहरातील मिळणारा निधी हा खूप तुटपुंजा आहे.त्यामध्ये दिव्यांगाची कोणतीही गरज भागत नाही त्यामुळे त्यामध्ये वाढ करून दहा हजार रुपये करण्यात यावी. अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केली.
सन 2017 मध्ये पासून राहुरी नगरपरिषद 3% निधी वाटप करते त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये तरतूद केलेली आहे तेवढाच निधी आजही वाटप केला जातो . त्यामध्ये 40% ते 60 %पर्यंत दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग बांधवांना 3000 रुपये 60 % ते 80 % असणाऱ्या दिव्यां बांधवांना 5000 व 80 % ते 100% असणाऱ्या दिव्यांग बांधवांना 6000 पेन्शन मिळत होती. दिव्यांगाच्या संख्येत वाढ झाल्याने आता तीन हजार व 80 %ते 100 % अपंगत्व असणाऱ्या चार हजार वर्षातून एकदाच पेन्शन मिळत आहे. 2017 मध्ये तीन टक्के निधी वाटप करणे बंधनकारक होतं.
परंतु आता दिव्यांग समान हक्क दिव्यांग अॅक्ट 2016 निधी हा 3% वरून 5% वर करण्यात आलेला आहे. परंतु राहुरी नगरपरिषदेने 5%निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही पायाभूत सुविधा, दिव्यांगांसाठी व्यवसाय, स्वयंरोजगार, त्यांना लागणारे साहित्य. एवढेच काय चार पाच वर्षापासून राहुरी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत मध्ये असणार लिफ्ट बंद पडलेला आहे त्याची दुरुस्ती केलेली नाही. इतका भोंगळ कारभार राहुरी नगरपरिषदेत चाललेला आहे.
दिव्यांगासाठी कुठलेही सुविधा मिळत नाहीत. मुख्याधिकारी साहेबांनीराहुरी शहरातील दिव्यांगाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये 80 %ते 100%असणाऱ्या दिव्यांगासाठी 10000रुपये 60% ते 80% असणाऱ्या दिव्यांग 9000 रुपये तसेच 40% ते 60% असणाऱ्या दिव्यांगासाठी 8000₹ किंवा 5%निधीची तरतूद करण्यात यावी.
तसेच लिफ्ट चे टेंडर काढून त्याची दुरुस्ती करून घ्यावी म्हणजे प्रशासकीय इमारतीमध्ये दिव्यांगाना जाण येण्यासाठी सोय होईल.अन्यथा माहितीचे अधिकारांमध्ये जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातील 5% निधी हा दिव्यांगावर खर्च करणे बंधनकारक आहे आणि हा खर्च दिव्यांगासाठी झाला पाहिजे ती मागणी पूर्ण न केल्यास दिव्यांग हृदय सम्राट बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल त्याच्या होणाऱ्या परिणामास जबाबदार राहुरी नगर परिषद राहुरी राहील. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेची जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका सचिव. रवींद्र भुजाडी. शहराध्यक्ष जुबेर मुसानी कार्याध्यक्ष संजय देवरे, शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले तालुका संघटक राजेंद्र घनवट इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a reply













