SR 24 NEWS

सामाजिक

ब्रह्मोत्सवच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रुपच्या वतीने तिरुपती बालाजी सेवा संपन्न !

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील व्यंकटेश ग्रुपच्या वतीने ब्रह्मोत्सवानिमित्त तिरुपती बालाजी येथे राहुरी येथील दहा महिलांचा बालाजी पद्मावती मंदिर सेवा करण्याचे भाग्य राहुरी येथील महिलांना लाभल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.या योगामध्ये दर्शन करणे हा केवळ योगायोग असतो व त्यासाठी मनीषा भुजबळ यांचे मार्गदर्शन या महिलांना लाभले आहे. तिरुपती येथील जुने बालाजी मंदिर पद्मावती मंदिर येथे सेवा करण्याची संधी मिळाली.विष्णू सदन येथे त्या महिलांची राहण्याची सोय करण्यात आली होती.

यामध्ये अन्नदान चौकशी कक्ष बुकिंग काउंटर येथे सेवा करण्याची संधी मिळाली त्या सेवेमध्ये तुलसी सेवा पुष्प सेवा काजू कापण्या अशा विविध सेवा समाविष्ट होत्या. त्यानंतर तिरुपती व्यंकटेश बालाजी यांच्या मुख्य गाभाऱ्यात सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या व्यंकटेश ग्रुपमध्ये सीमा कालिया, सोनाली उदावंत, नीता दायमा, पूनम धिमते, मीना शिंदे, मनीषा राजभोज, वैशाली खोसे, सुप्रिया सोहनी, सुनीता भगत, सुनिता भिटे आदी महिलांचा समावेश होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!