तुळजापूर / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे हरी ओम कोरेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रि SRD/NRD पथसंचलन निवड चाचणी मधून निवड झाली.
अणदूरच्या जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक हरीओम सुधीर कोरे बी. एस्सी. द्वितीय या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरावर सन 2025-26 या वर्षात पूर्व राज्यस्तरीय/राष्ट्रीयस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी करिता निवड झाली. राज्यस्तरीय निवडीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे पूर्व राज्यस्तरीय/राष्ट्रीयस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणीसाठी दि. 26 ते 28 सप्टेंबर, 2025 या कालावधीत उपस्थित राहणार आहेत.
या निवडीबद्दल संस्थेचे सचिव श्री. रामचंद्र (दादा) आलुरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. उमाकांत सलगर, डॉ. मल्लिनाथ बिराजदार व सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.
जवाहर महाविद्यालयाच्या हरीओम कोरे ची प्रि SRD/NRD राज्यस्तरीय पथसंचलन शिबिरासाठी निवड

0Share
Leave a reply












