SR 24 NEWS

इतर

बारागाव नांदूर व 14 गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध – आ. शिवाजीराव कर्डिले यांचे आश्वासन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील नावलौकिक असलेली बारागाव नांदूर व 14 गावे संयुक्त पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिले.

संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी संदर्भात आ. कर्डिले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी ते बोलत होते. आ. कर्डिले म्हणाले की, या महत्त्वाच्या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. खर्चाचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविण्यात आले असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

याचबरोबर कुरणवाडी व 19 गावे पाणीपुरवठा योजना यांनाही निधी मिळण्यासाठी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. “या योजना सुरळीत चालाव्यात यासाठी शासनाकडून निधी लवकरच प्राप्त होईल,” असा विश्वास आ. कर्डिले यांनी व्यक्त केला.या भेटीत योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी राहुरी तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, अनिल आढाव, गोरक्षनाथ तारडे, मधुकर तारडे, अण्णासाहेब देवरे, आशिष बिडगर, धनंजय आढाव, विराज धसाळ, विक्रम पेरणे, बापूसाहेब वाघ, संतोष धसाळ, विनीत धसाळ, राहुल तमनर आदींसह लाभार्थी गावांचे सरपंच, सदस्य व अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!