विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव कमिटीची बैठक गावच्या वेशी समोरील पारावरती नुकतीच ग्रामस्थांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावर्षीच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी संपतराव तराळ यांची तर उपाध्यक्षपदी संजय खिलारी (मेजर), खजिनदारपदी संजय झावरे, सचिवपदी पत्रकार वसंत रांधवण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. टाकळी ढोकेश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बनाई देवी यात्रा गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी दि.२१ ते २४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमांसाठी नियोजन बैठकीमध्ये आगामी यात्रेचे नियोजन यशस्वी करण्यासाठी नवीन यात्रा कमिटीची कार्यकारिणी सज्ज झाली आहे.
बनाई देवी यात्रा उत्सव कमिटी नुतन कार्यकारणी ती पुढीलप्रमाणे: अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी (मेजर), खजिनदार – संजय झावरे, सचिव पत्रकार वसंत रांधवण तर सल्लागार म्हणून बाळासाहेब खिलारी,अशोकशेठ कटारिया, युवा उद्योजक राजूशेठ भंडारी, तर प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार वसंत रांधवण, हगामा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी,बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे ,सदस्यपदी – अंकुश पायमोडे, संतोष बांडे, किसन धुमाळ,सागर तराळ,शरद झावरे, शिवाजी खिलारी, अशोकशेठ कटारिया, विलास झावरे,धोंडिभाऊ झावरे, उपसरपंच रामभाऊ तराळ,बापूसाहेब रांधवण, विक्रम झावरे, गणेश चव्हाण, दिगंबर शेळके, विकास आल्हाट,मळिभाऊ रांधवण,सिराज हवालदार व इतर यांचा समावेश आहे.
ही निवड झाल्यानंतर ग्रामस्थ आणि भाविकांकडून कमिटीचे अभिनंदन केले जात असून, यात्रेच्या कामाला आता अधिक वेग येणार असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी यात्रा कमिटीचे मार्गदर्शक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब खिलारी यांनी होणाऱ्या यात्रेची रूपरेषा सांगितली. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कमिटीकडून यंदाच्या चार दिवसीय होणाऱ्या यात्रेत विशेष विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक मनोरंजनाचे, कुस्त्यांचा आखाडा,बैलगाडा शर्यतींचा उपक्रम व सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे.
टाकळीढोकेश्वर यात्रा उत्सवासाठी नविन कार्यकारिणीची निवड जाहीर, अध्यक्षपदी संपतराव तराळ तर उपाध्यक्षपदी संजय खिलारी

0Share
Leave a reply












