ब्राम्हणी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शनिशिंगणापूर मार्गावर ब्राम्हणी परिसरात शनिवारी (दि. २० सप्टेंबर) रात्री सुमारे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्राम्हणी परिसरात मुक्ताई पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या अपघातात ब्राम्हणी येथील अमोल केशव हारेल (वय अंदाजे २८ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हारेल हा आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून जखमी तरुणाचा पाय पूर्णतः फॅक्चर होऊन रस्त्यावर रक्ताचे मोठे डाग पडले होते. हा दृश्य पाहून परिसरातील नागरिकांच्या अंगावर शहारे आले.या घटनेमुळे ब्राम्हणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिशिंगणापूर मार्ग हा नेहमीच धोकादायक मानला जात असून येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर ब्राम्हणी परिसरात भीषण अपघात ; ब्राम्हणी येथील तरुणाचा मृत्यू

0Share
Leave a reply












