राहुरी वेब प्रतिनिधी : राहुरी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे लाईनवर शनिवारी (दि. २७ डिसेंबर) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक रेल्वे अपघाताची घटना घडली. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६) यांचा रेल्वेखाली येऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दत्तात्रय चव्हाण हे सकाळी रेल्वे लाईनवरून चालत जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते. याच दरम्यान दोन्ही बाजूंनी रेल्वेगाड्या येत असल्याने त्यांचा अंदाज चुकला. त्याच वेळी एका बाजूने वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून. घटनास्थळी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी जमली होती. घटनेची माहिती सरपंच विराज धसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल जयदीप बडे, चाँद पठाण, योगेश आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. असून या सदरील घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस व राहुरी पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे तांदूळवाडी व राहुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a reply













