तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) २१ सप्टेंबर : तुळजापूर विधानसभा मतदारसंघासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिके व फळबागा पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्या आहेत. या परिस्थितीत राज्य शासनाने पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, सततच्या पावसामुळे कांदा, ज्वारी, बाजरीसह खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. बागायती क्षेत्रातील ऊस आडवा पडलेला असून द्राक्ष, आंबा, पेरू, पपई यासारख्या फळबागांचेही उत्पादन मिळणे अशक्य झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून झाडांच्या मुळाशी पाणी साचल्याने फळधारणा होणार नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
अतिवृष्टीमुळे गावांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेले आहे. त्या नुकसानग्रस्त कुटुंबांचेही पंचनामे करून मदत दिली जावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडतील, असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करावी – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मागणी

0Share
Leave a reply












