तुळजापूर / चंद्रकांत हगलगुंडे (२२ सप्टेंबर) : प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सवात पायी जाणाऱ्या राज्यासह आंध्र कर्नाटक राज्यातून दैनंदिन हजारो भाविकांची गर्दी असते. अनंत अंतर पायी प्रवासामुळे भाविकांच्या पायाला फोड येणे, ताप येणे अशक्तपणा सारख्या आजाराने थकून जातात. या सर्वांचे देखभाल विशेषतः आरोग्याची निस्वार्थ सेवा करण्याचे काम गेले कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतचे सदस्य तथा डॉ. विवेक बिराजदार यांची सेवा खरोखरच लाख मोलाची असल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार तथा सा. त्रिकाल सत्यचे संपादक गुरुनाथ कबाडे यांनी व्यक्त केले.
अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी तुळजाभवानी साखर कारखानासमोर प्रथमोपचार आरोग्य कक्षाच्या शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी ग्रा.पं. सदस्य तथा डॉ. विवेक बिराजदार व डॉ. विशाखा वडवले यांच्या हस्ते आरोग्य कक्षाचा शुभारंभकरण्यात आला. त्याचबरोबर गेली पंचवीस वर्षापासून नवरात्र उत्सवात पायी जाणाऱ्या भाविकांसाठी 24 तास सेवा देण्याचे काम करतात. मा. आ. मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी पौर्णिमेपर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाते.
त्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव मा.जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण व तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण हेही या सेवेत तन मन धनाने सहभागी होतात. या सेवेत मधुशाली नगर साखर कारखान्यातील कर्मचारी ही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सेवा देण्याचे काम करतात. आरोग्य सहाय्यक कदम, साखरे, साबळे, फार्मासिस्ट गावडे, दुधाळकर, तमा कापसे, पिंटू लोहार आशा कार्यकर्ते घुगे, नागेश करपे, स्वप्निल रोकडे सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रौत्सवात पायी जाणाऱ्या भाविकांसाठी, डॉ. विवेक बिराजदार यांची सेवा लाखमोलाची – गुरुनाथ कबाडे

0Share
Leave a reply












