अणदूर प्रतिनिधी /चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील मा.पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांची भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून फटाके व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साहेबरावांच्या रूपात पक्षातील निष्ठेला फळ आणि भावी कार्याला बळ मिळाल्याने सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
गेल्या 30 वर्षापासून विद्यार्थी दशेपासूनच देशभक्तीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ सक्रिय कार्यकर्ता तर भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत पाईक म्हणून त्यांची वाटचाल खरोखरच डोळ्यात अंजन घालणारी आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी ते 24 तास तन-मन-धनाने कार्य करताना दिसतात.
जीव घेण्या कोरोना काळात माणूस माणसाला तर सोडाच पण भावा- भावाला ओळखत नव्हता अशा काळात निराधार, भिकारी, उपासमार जनतेला तब्बल चार महिने दैनंदिन शंभरहून अधिक डबे घरपोच जेवण देण्याचे त्यांचे कार्य न भूतो म्हणावे लागेल. जिल्हा परिषद , पंचायत किंवा ग्रामपंचायत माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी निरपेक्ष भावनेने त्यांचे कार्य सर्वसामान्य जनता कदापि विसरू शकत नाही.
गेल्या तीन दशकापासून असंख्य अडचणी समस्यांना तोंड देऊन ग्रामीण भागात भाजपाचे कमळ घरोघरी पोहोचण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी मारून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तविक पाहता त्यांची कर्मभूमी व जन्मभूमीत काँग्रेस पक्षाचे प्रचंड प्राबल असताना देखील ते कधीच डगमगले नाहीत, असंख्य अमिषाला धुडकावून कमळाची साथ सोडली नाही हे विशेष. गेल्या पंधरा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश भाजपमय होताना दिसत असले तरी जुने व नवे वादही निर्माण झाले अशा परिस्थितीतही अलिप्त राहून निव्वळ कार्यकर्त्याची भूमिका बजावली. भाजपासाठी सर्व काही हे ब्रीद घेऊन काम व मेहनत करून निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख कायम ठेवली.
देर है लेकिन अंधेर नही याची प्रचिती उशिरा का होईना निष्ठावंत पक्षाशी इमानदारीने केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना मिळालेला फळ व बळ कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे आहे एवढे मात्र निश्चित.
Leave a reply













