राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) – राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी आप्पासाहेब माधव वरखडे (वय ५०) यांचे मंगळवारी १२ ऑगस्ट रोजीअपघाती निधन झाले. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आप्पासाहेब वरखडे हे स्वभावाने मनमिळाऊ, समाजकार्यशील आणि मदत करणारे होते. त्यांनी आपल्या कार्यतत्परतेमुळे आणि नम्र स्वभावामुळे स्थानिक समाजात चांगली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे. ते माधव वरखडे यांचे सुपुत्र तर प्रभाकर वरखडे यांचे बंधू होत. कुटुंबातील सर्वच सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्यावर (दि.१2ऑगस्ट ) रोजी राहुरी फॅक्टरी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Leave a reply













