तास (ता. पारनेर) / गंगासागर पोकळे : तास (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र तास येथे श्री हनुमान उत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कथा व कीर्तन कार्यक्रमांचे विशेष आयोजन या सप्ताहात करण्यात आले असून, विविध नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानुसार, 13 ऑगस्ट रोजी सौ. प्रतीक्षाताई नाथा बर्डे यांचे कीर्तन, 16 ऑगस्ट रोजी विनोदाचार्य महेश आप्पा मडके (आळंदी) यांचे कीर्तन तर 20 ऑगस्ट रोजी यशवंत महाराज थोरात (अध्यक्ष, श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था, ढवळपुरी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या पवित्र धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हरिनाम सप्ताहातील कीर्तन, कथा आणि पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळनर यांनी केले आहे.
Leave a reply













