SR 24 NEWS

जनरल

मानोरी–वळण शिवरस्त्यावरचे अतिक्रमण हटवले; रहदारीला दिलासा

Spread the love

मानोरी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ मंडळ अंतर्गत मानोरी–वळण गावदरम्यानच्या शिव रस्त्यावरचे अतिक्रमण गुरुवारी महसूल विभागाने ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवले. रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार १ ते ७ ऑगस्टदरम्यान विशेष महसूल सप्ताह राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट कार्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

मंडळ अधिकारी बाळकृष्ण जाधव आणि मानोरी ग्राम महसूल अधिकारी सोनाली जन्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने मानोरी–वळण शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. परिणामी रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे मोकळा झाला असून, नागरिकांना आता विनाअडथळा वाहतूक करता येणार आहे.

या कारवाईवेळी गावातील अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये युवा नेते बापूसाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, कचरूनाना आढाव, चांदभाई शेख, बाळासाहेब खुळे, गोरक्षनाथ गुंड, कोंडीराम देवकाते, चांदभाई पठाण, अनिस शेख, साहेबराव पिसाळ, युनूस पठाण आदींचा समावेश होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!