इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : गुरुवार दिनांक ०७/०८/ २०२५ रोजी राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित , विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कुल व जुनिअर कॉलेज भिगवण या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ भिगवण आयोजित, आयडियल स्टडी मोबाईल ॲपचे वितरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष मा .निखिल शेठ बोगावत, उपाध्यक्ष मा .प्रवीण भैय्या वाघ,सचिव कुलदीप ननवरे, खजिनदार किरण शेठ रायसोनी तसेच माजी पदाधिकारी व संचालक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष मा . निखिल शेठ बोगावत व माजी अध्यक्ष संतोष शेठ सवाणे यांनी या ॲप विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ भिगवण आयोजित राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे चेअरमन मा. श्री .बापूराव थोरात (नाना) ,सचिव मा. श्री . विजयभैय्या थोरात ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना थोरात मॅडम यांनी सर्व रोटरीच्या पदाधिकारांचे आभार व्यक्त केले . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . उज्वला वाघ मॅडम यांनी केले.
विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल व रोटरी क्लब भिगवण यांच्या विद्यमाने आयडियल स्टडी मोबाईल ॲपचे वितरण

0Share
Leave a reply












