SR 24 NEWS

इतर

मानोरी ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश, वनविभागाने तातडीने लावला पिंजरा  

Spread the love

मानोरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवून ठार केल्याने शेतकरी वर्गातून अनेक दिवसापासून पिंजरा बसविण्याची मागणी केली गेली होती. तसेच अनेक वृत्त पत्रानी बातमी प्रदर्शीत केल्या नंतर अखेर वनविभागास जाग आली असून मानोरी येथे अखेर तातडीने पिंजरा बसविण्यात आला आहे.

मानोरी गुरुवारी मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असता मानोरी गावचे सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने सदरील घटनेचा पंचनामा करुन पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या भागामध्ये दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढला असून अनेक घटना घडत असून अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राण्यावर जनावर बिबट्या हल्ला करत आहे तरी वनविभागांनी या गोष्टीचा गंभीररित्या विचार करून पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. अखेर ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता काल वनविभागाने मानोरी परिसरात पिंजरा लावला आहे. यामुळे शेतकरी वर्गास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!