अहमदपुर प्रतिनिधी / नंदराज पोले : अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती रोजीनिमित्त (दि.२६) रोजी परिवर्तन संस्थेचे सचिव बालाजी शिंदे यांनी सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्याची दखल घेवुन ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने नांदेड येथील रुबी हॉल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये बालाजी शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षा पासुन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन दलित, वंचीत, शोषीत, मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकरी, गायरानधारकां करीता काम करतात तसेच भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मूल्यवर्धीसाठी नेहमी अग्रेसर आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न-गायरान, वनजमिनी व वहीत जमिनी लाभार्थ्यांच्या नावे करण्या करिता करत असलेले प्रयत्न, निवासी अतिक्रमणाचा कायदेशीर हक्क, तसेच दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, आरोग्य सुविधा व न्याय हक्क मिळवून देणे अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने संघर्ष चालविला आहे.या कार्याची दखल घेत अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडचे संस्थापक अध्यक्ष बा.रा.वाघमारे यांनी अहमदपुर येथील परिवर्तन संस्थेचे सचिव बालाजी शिंदे यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देवुन सन्मानित केले.
यावेळी पँथर नेते रमेशभाई खंडागळे, डी.एस.वाघमारे यांच्या सह चळवळीतील जेष्ठ मान्यवरांची विचार पीठावर उपस्थिती होती.या पुरस्कारामुळे सामाजिक चळवळीत काम करण्याची अधिक उर्जा मिळाली असल्याचे बालाजी शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अहमदपुर येथील बालाजी शिंदे यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार’ प्रदान

0Share
Leave a reply












