SR 24 NEWS

सामाजिक

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे आंबिजळगावला स्वागत, हजारो भाविकांनी घेतले दर्शन 

Spread the love

कर्जत प्रतिनिधी / सुनील खामगळ : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे रविवारी सकाळी आंबिजळगाव भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी वाजत गाजत टाळ मृदंग वीणा च्या जयघोषात तल्लीन होऊन दिंडीचे स्वागत केले.तसेच निवृत्तीनाथ दिंडी रथाचे सारथ्य केले. या दिंडी मध्ये लाखो भाविक सहभागी झाले आहेत. हि दिंडी त्र्यंबकेश्वर ( जि . नाशिक येथुन पंढरीकडे मार्गस्थ झाली . या वेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दिंडीचे चालक ह.भ.प. बेलापूर महाराज यांनी बोलताना सांगितले? आंबिजळगावचे ग्रामस्थ अतिशय सुंदर दिंडीचे नियोजन करतात. ह.भ.प. बेलापूर महाराज याचा नारळ देऊन आंबिजळगाव ग्रामस्थ च्या व आंबिजळगाव ग्रामपंचायत च्या वतीने रोहीत निकत पाटील यांनी सत्कार केला.यावेळी सागर निकत , प्रविण निकत,विशाल बळे, योगेश भांडलवकर, नवनाथ महाराज अनारसे, राजेंद्र शिंदे,प्रशांत कका कुलकर्णी , लक्ष्मण महाराज निकत, बापू निकत, प्रशांत गायकवाड ,चोपदार, कांतीलाल लोंढे, गटविकास अधिकारी रुपचंद जगताप साहेब ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी धांडे ग्रामपंचायत अधिकारी मुकणे भाऊसाहेब नामदेव तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!