SR 24 NEWS

सामाजिक

बी द चेंज फाउंडेशन शिर्डी यांच्यावतीने डॉ.संदिप तांबे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Spread the love

सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगांव येथील रहिवाशी व सध्या कृषि महाविद्यालय, सोनई या ठिकाणी कार्यरत असलेले विद्यार्थी कल्याण तथा क्रीडा अधिकारी डॉ. संदिप कडूभाऊ तांबे यांनी केलेल्या शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रसन्न पोपटराव पवार,बी द चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

डॉ. संदिप तांबे यांनी आतापर्यंत कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असतात.महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार त्यांना तीन वेळेस मिळालेला आहे. या पुरस्काराबद्दल मुळा एज्युकेशनचे मार्गदर्शक मा.मंत्री आ.शंकरराव गडाख, संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख,नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख,सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा.सुनिल बोरुडे यांच्यासह अनेकांनी डॉ. संदिप तांबे यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!