राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत बियाणे विभागाच्या वतीने मौजे इन्शी, ता. कळवण, जि. नाशिक येथे अनुसूचित जमाती (TSP) अनुदानातून आदिवासी शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील विद्यापीठ संशोधीत सोयाबीन पिकाचे फुले किमया व दूर्वा या वाणाचे मोफत बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे नेतृत्वाखाली संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी इन्शी गावचे सरपंच श्री. बाळासाहेब पवार, पोलीस पाटील श्री. तुळशीराम पवार, गोळाखोल गावचे सरपंच प्रभाकर गायकवाड, पोलीस पाटील श्री. रामदास पवार, कृषी सहाय्यक अमोल पाटोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विपणन अधिकारी डॉ. दिलीप ठाकरे यांनी केले. उपस्थित शेतकर्यांना डॉ. अविनाश कर्जुले यांनी बीज प्रक्रिया, डॉ. के.सी. गागरे सोयाबीन वाणांची व डॉ. नितीन दानवले यांनी आधुनिक सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली.
यावेळी एकूण 443 लाभार्थी शेतकर्यांना प्रति एकर क्षेत्राचे 26 किलो प्रति बॅग प्रमाणे एकूण 11 क्विंटल 518 किलो सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. गावचे सरपंच व स्थानिक पत्रकार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. नितीन दानवले यांचे नेतृत्वाखाली श्री.भूषण हंडाळ, संदीप कोकाटे व बियाणे विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी चांगले नियोजन केले. याप्रसंगी पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply












