SR 24 NEWS

कृषी विषयी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.विलास खर्चे यांची नियुक्ती

Spread the love

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. विलास खर्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी राज्यपाल यांच्या कार्यलयाकडून याबाबतचे अधिकृत निवडपत्र डॉ. खर्चे यांना प्रदान करण्यात आले. माजी कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांच्या निधनानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता.

काल 30 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यपाल यांच्या समतीमार्फत पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीच्या निकालानुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संचालक संशोधन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विलास खर्चे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

डॉ.विलास खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या दोन्ही विद्यापीठात क्षारयुक्त जमिनींच्या संशोधनासाठी संशोधकांची चमू तयार करून तसेच विविध प्रकल्पांतर्गत या समस्यायुक्त जमिनींच्या योग्य निदानासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सातत्याने संशोधन कार्य करीत प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच डॉ. खर्चे यांनी कृषी क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक उन्नतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!