SR 24 NEWS

क्राईम

संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 34,84,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : दिनांक 30/06/2025 रोजी पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जमजम कॉलनी, 09 नं.गल्ली, संगमनेर येथे इसम नामे हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्याचे पत्र्याचे गोडावून मध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत.. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता 08 ते 09 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले.पथक कारवाई करत असताना संशयीत इसम हे आडोश्याचा फायदा घेऊन पळून गेले. 

पथकाने घटनाठिकाणावरून 34,84,000/-रू किंमतीचा मुद्देमाल त्यात 2,700 किलो गोमांस, 2 महिंद्रा बोलेरो पिकअप, 1 अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त, 5 दुचाकी वाहन, 4 इलेक्ट्रीक वजन काटे, लोखंडी सुरा व लोखंडी कुऱ्हाड व 02 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना ठिकाणवरून पळून गेलेले इसम व गोवंश जनावराची कत्तल करण्याच्या व्यवसायाबाबत विचारपूस करून 1) हाजी मुदस्सर कुरेशी, रा.संगमनेर, जि.अहिल्यानगर  (फरार) 2) नवाज जावेद कुरेशी, रा.संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) 3) फईम कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) 4) अक्रम कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) 5) समीर कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) व इतर 4 ते 5 अज्ञात इसमांविरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुरनं 600/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व मा.श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!