अकोले : अकोले पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असताना पोलिस हवालदार किशोर लक्ष्मण तळपे (वय ४०) यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. किशोर तळपे हे ४० वर्षांचे होते आणि ते अकोले पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. रविवारी ते ऑन ड्युटी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तळपे यांच्याकडे रविवारी दुपारनंतर ठाणे अंमलदार पदाचा (पीएसओ) पदभार होता. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कामकाज करत असताना कार्यालयात चक्कर येऊन पडले. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात नेले. औषधोपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. संगमनेर तालुक्यातील घारगाव-कर्जुले पठार भागातील तळपेवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहीण, असा परिवार आहे.
अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल किशोर तळपे यांचा ऑन ड्युटी हृदयविकाराने मृत्यू

0Share
Leave a reply












