श्रीरामपूर प्रतिनिधी / जीतू शिंदे : धुळे शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि नगरसेवक श्री. संतोषराव पाटील खताळ यांनी श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे येथील आनंद निकेतन इंग्लिश मिडियम स्कूलला विविध क्रीडा साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने रंगनाथ अण्णा तमनर यांच्या हस्ते त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमावेळी शाळेच्या प्राचार्य संगीता कोळेकर, सचिव कोळेकर सर, तसेच शाळेतील शिक्षकवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सुखदेव शिंदे, शिंदे पाटील, कविता दरंदले, शितल सातपुते, स्वाती पारखे, सारिका काळे, सारिका खर्डे, आचल देठे, पोर्णिमा कानडे, गायत्री साळवे यांचा समावेश होता.सत्कार समारंभानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पाटील यांनी शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही सहभाग घेऊन सर्वांगीण विकास साधावा, असे ते म्हणाले.
या वेळी प्राचार्या संगीता कोळेकर यांनी श्री. पाटील यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण होऊन शाळेच्या एकूण विकासास निश्चितच चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. सदरील कार्यक्रम उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडला. उपस्थितांनी उद्योजक संतोषराव खताळ यांच्या सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
धुळेचे उद्योजक संतोषराव खताळ यांच्याकडून आनंद निकेतन इंग्लिश मिडियम स्कूलला क्रीडा साहित्याचे योगदान ; शाळेत सत्कार समारंभ

0Share
Leave a reply












